sunflower cultivation in India

शाश्वत नफा कसा कमवायचा? या प्रश्नाचे उत्तर शोधा!

आपल्या शेतात कोणते पीक लावावे? हा जरी एक व्यक्तिगत निर्णय असला तरी नेहमी प्रमाणे सुमार नफा कमवण्या पेक्षा अधिक काय करता येईल? यावर  उहापोह करायला हवा. त्यासाठी आपण निर्माण करत असलेल्या उत्पादनाचा दर्जा व त्यातील मूल्यवर्धनाची संधी शोधायला काय हरकत आहे? या लेखात केलेली चर्चा आपण इतर अनेक पिकात लागू करू शकता. लेख वाचायला फक्त दोन मिनिट लागतील म्हणून ओळ अन् ओळ नक्की वाचा! 

कोणत्याही पिकांची निवड करते वेळी, कुणी नुकसान व्हावे म्हणून, एखादे पीक निवडत नाही. कुणी आपल्या पारंपरिक पिकांची निवड करतो तर कुणी प्रयोग म्हणून नवीन पीक निवडतो. कधी कधी पिकांची निवड मुख्य पीक लावायला अवधि असतो व मधल्या वेळेत थोडी कमाई होऊ शकेल, या आशेने हे पीक निवडले जाते. पीक निवडीच्या या सुमार प्रक्रियेतून, बहुतांश शेतकऱ्यांची आवक सुमार रहाते व तो आर्थिक प्रगती साध्य करू शकत नाही. 

आपल्याकडे सूर्यफूल लागवड (Sunflower cultivation) क्वचित काही शेतकरी करतात. कोरडवाहू शेतकरी खरीपात सूर्यफूल लागवड करतो. खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी असा विचार असतो. 

सूर्यफूल शेतीमूळे (Benefits of sunflower cultivation) मृदेचा कस सुधारतो, सेंद्रिय कर्ब वाढीस लागते, मित्र जिवाणू संख्या वाढते, तण कमी होते व मधमाशांची संख्या वाढते. भारतीय शेतकऱ्यासाठी या बदलांची नितांत गरज आहे.  

बागायती शेतकरी रब्बी सूर्यफूल लागवड सप्टेंबर-ऑक्टोबर तर उन्हाळी लागवड जानेवारी व फेब्रुवारी मध्ये करतो.   कोणत्याही कारणांमुळे रिकामे पडलेले शेत खात्रीशीर आवक देऊन जाईल हे उद्दिष्ट असते. 

सूर्यफूलास व्यवस्थापन खर्च अतिशय कमी असून थोडेफार घरचे सेंद्रिय खत (organic manure), सबसिडी मधील रासायनिक खते (Urea, MOP, DAP, Sulphur, Gypsum, Micro-nurients) व सामान्य सिंचन पुरेसे ठरते. एकरी 10 हजाराच्या आसपास गुंतवणूक होऊन चार महिन्यात, चार ते पांच पट नफा होण्याची हमी असते. परंतु या नफ्यातून तो इतर वेळी झालेले नुकसान भरून काढू शकत नाही.  सरासरी मिळकत सुमारच रहाते. अतिरिक्त आवक न झाल्यामुळे आर्थिक स्थितित काडीमात्र सुधारणा होत नाही. 

सूर्यफूल तेलाचा (Sunflower oil) व्यापार कसा आहे? हे समजाऊन घेऊ. 

भारतात खपणाऱ्या सूर्यफूल तेलाचा मोठा हिस्सा यूक्रेन व रशियातून येतो. पूर्वेकडून येणारे पामतेल व पश्चिमेकडुन येणाऱ्या सोयातेला पेक्षा, सूर्यफूल तेलाची किंमत किलो मागे 9 ते 10 रुपये जास्त असते. हे तेल कच्चे असते व भारतात आल्यावर त्यावर प्रक्रिया करून फिल्टर व रिफाईन तेल बनवण्यात येते. ही प्रक्रिया करतेवेळी यातील तरंगणारे कण, मेण, तरल तेल काढून घेतले जाते. प्रीझरवेटीव मिसळले जातात जेणे करून पुढील पेकेजिंग, साठवण व वितरण करते वेळी ते अधिक काळ टिकून राहील. या प्रक्रियेत तेलातील पोषणमूल्यांचा  ऱ्हास होतो. यात थोड्या प्रमाणात भेसळ करून जास्त नफा कमवायची व्यापारी लालसा भागवली जाण्याची  शक्यता, नाकारता येत नाही. काय घडते ते सर्वांना ठाऊक आहे पण धडधडीत लिहून काय फायदा? समझदार को इशारा काफी है! निष्काळजी, बेसावध व अजाण ग्राहक, आकर्षक पेकिंग,  जाहिरातीतून पोसलेले ब्रॅंड व भ्रष्टाचारी शासन व्यवस्था अश्या पद्धतीने पाप झाकून टाकले जाते. असो..   

2020 सालच्या एफ ए एस एस आय च्या अभ्यासावरुन असे लक्षात आले की बाजारीतिल  24.2% तेलाचे नमुने भेसळयुक्त (adulteration in oil)) असून आरोग्याला घातक आहेत! 

कोविड व यूक्रेन-रशिया युद्ध-आरंभ काळात तिकडून येणारा सूर्यफूल तेलाचा रतीब कमी झाला होता त्यामुळे आपण अर्जेंटिना,  रोमानिया व  बल्गेरिया या देशातून चढया भावाने तेल आयात केले. या काळात आपल्याकडे सूर्यफूल लागवडीची एक लाट येऊन गेली. पण पुढे परिस्थितित सुधारणा झाल्यावर या दोघी देशामध्ये भारतात तेल पाठवण्याची चढाओढ सुरू झाली. बदलेल्या परिस्थिति मध्ये सूर्यफूल तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढली व तेलाची किंमत घटली. सूर्यफुल लागवडीची आलेली लाट, आली तशी ओसरली. पुढे आयतीत तेलावर प्रक्रिया करण्याची आपली क्षमता कमी असल्यामुळे, वाढलेली आयात थोडी रखडली, पण दर तळालाच राहिले कारण तेलाची आवक टिकून होती व आहे. यावरून तेलाच्या किमतीत उतार चढाव कसा होतो हे आपण समजू शकतो. 

आपल्या देशात 2022-23 या वर्षात 27 लाख मे. टन सूर्यफूल तेल वापरात आले, हे एकूण खपाच्या 11 टक्के इतके भरते.

भारतात तेलाचा प्रतीव्यक्ति वार्षिक खप 18 किलो आहे. यातील 12 किलो तेल व्यक्तिगत पद्धतीने तर उर्वरित 6 किलो तेल औद्योगिक स्वरूपातुन खपते. पामतेल, सोयबिन तेल, सरकी तेल यांचा खप गरीब जनतेत व उद्योगात जास्त असतो तर सूर्यफूल तेल, सरसो तेल, शेंगदाणा तेल, तीळतेल, करडई तेल व  खोबरेल तेलाचा खप आर्थिक दृष्ट्या सबळ वर्गात होतो. 

आपल्याकडे फिटनेस कडे लक्ष्य देणाऱ्या लोकांची संख्या जशी वाढते आहे तशी सूर्यफूल तेल वापरणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढते आहे. मागणी वाढत असल्याने आयात वाढत जाणार आहे. पण आंतरराष्ट्रीय वाटाघाटी व सातत्याने बदलणाऱ्ऱ्या राजकीय घटनांमुळे तेला च्या किमतीत मोठा उतार चढाव होत राहील व आपल्या कडील सामान्य शेतकरी आशा-निराशेच्या गर्तेत अडकून, सूर्यफुलासारखे एक चांगले पीक दुर्लक्षित करेल. पण इथे एक संधि लपलेली आहे, ती कशी ते आता बघू.

जून 27, 2024 ला द इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्रानुसार भारतात व्यायाम व पोषणा बद्दल जागृतीत लक्षणीय वाढ झाली आहे. कोविड व मध्यमांमुळे लोकं जागृत होत असून आरोग्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.    

आपल्या देशात मोठी आर्थिक दरी निर्माण झाली आहे. 20 करोंड कफल्लत, 40  करोंड गरीब, 60 करोंड मध्यम वर्ग व 20 करोंड सबळ अशी जनतेची वर्गवारी आहे. यातील सबळ व उच्च मध्यमवर्ग मिळून संख्या 30 ते 35 करोंड अशी आहे. हा वर्ग महत्वाकांक्षी जीवन जगते. त्यांना पोट भरायचे नसते तर स्वाद घ्यायचा असतो! त्यांना नुसते तेल नको असते! त्यांना हवे असते आरोग्यदायी, रुचकर, नैसर्गिक तेल आणि शुद्धतेचा विश्वास! हा वर्ग जागृत असल्याने, एकतर खूप चांगल्या ब्रॅंड चे तेल वरपतात किंवा स्वत:समोर काढलेले लाकडी घाणीचे किंवा घरगुती इलेक्ट्रिक घाणीचे (Homemade oil) तेल वापरतात.  हा वर्ग एक किलो विश्वासार्ह तेलासाठी, पाचशे रुपया पर्यन्त सहज खर्च करू शकतो!! हा दर खुल्या बाजाराच्या दुप्पट व उत्पादन खर्चाच्या जवळपास 10 पट आहे. 

स्टार्टअप युग सुरू आहे. नवीन विचार व माहितीतंत्र ज्ञानवरआधारित नव उद्योगांना सरकार, बँक, खाजगी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध करून देत आहेत.  प्रक्रियाउद्योग, लाईफ स्टाइल, ई-कॉमर्स, क्वीक कॉमर्स, यांत्रिक विकेंद्रीकरण यांचा मेळ घालत अनेक स्टार्टअप कंपन्या युनिकॉर्न होण्यासाठी धडपडत आहेत.  

ज्यावेळी शेतकरी सूर्यफूल बी व्यापाऱ्याला विकतो तेव्हा त्यावर प्रक्रिया करण्याचा हक्क घालवून बसतो. समजा शेतकऱ्याने सूर्यफूल बी, सूर्यफूल गर किंवा लाकडी घाण्यावर काढलेले तेल, वर सुचवलेल्या जागृत ग्राहकाला पुरवायची तयारी केली, तर आयातीमुळे ठरणाऱ्या तेल दरांपासून, तो स्वत:ला वेगळे करू शकतो. आपल्या उत्पादनाचा दर स्वत: ठरवू शकतो. अर्थात, या साठी नियमित व दर्जेदार पुरवठा करण्याची चोख तयारी करावी लागेल शिवाय  चोख विपणन व्यवस्था देखील निर्माण करावी  लागेल. पूर्वी हे थोडे कठीण होते पण आज नवीन तंत्रज्ञाना मूळे हे सहज शक्य आहे. हे पीक तीन हंगाम घेता येते व पिकावर फार रोग किडी येत नाही, वातावरण बदलांचा फटका या पिकास कमी बसतो ज्यामुळे नियमित व दर्जदार पुरवठा शक्य आहे.  ई-कॉमर्स, क्वीक कॉमर्स मुळे थेट ग्राहका कडून ऑर्डर मिळवून होम डिलीवरी देता येते. डी मार्ट, रिलायन्स फ्रेश, एमेझोन  अश्या मोठ्या वितरण प्रणालीशी जुळणे ही आता खूप सोपे झाले आहे. अश्या प्रकारे शेतकरी बांधवांस किंवा संघास प्रीमियम मार्केट उपलब्ध होऊन चांगला नफा कामावण्याची संधि उपलब्ध होऊ शकते.

सरकार देखील अशा प्रयत्नाना बळ देते आहे कारण यातून घरगुती तेलबिया उत्पादन (Indigenous production) वाढून आयात कमी करता येईल व प्रसंगी शक्य झाले तर निर्यात वाढवून विदेशी चलन देखील कमवता येईल. 

मित्रहो, जे चांगल्या किमतीत विकता येईल ते पिकवले व बनवले तर प्रत्येक हंगामात नफा मिळण्याची शक्यता वाढत जाऊन आर्थिक संचय करता येईल. यालाच आर्थिक विकास म्हटले जाते! अश्या प्रकारच्या प्रयत्नातून आपण शाश्वत नफा (Sustainable profit) कमवू शकतो.    

मित्रहो, रिसेटएग्री डॉट इन ही वेबसाइट आपल्याशी नियमित संवाद साधत आहे. कमेन्ट करून आपण प्रतिसाद देऊ शकता.    

दोन मिनिटांत वाचून होणारे आमचे लेख आपल्याला कालबाह्य धारणा  खोडायला मदत करतील. काही लेख आपल्याला जागृत करतील, मनोधैर्य उंचावतील, उपयुक्त माहिती देतील,  प्रश्न विचारतील किंवा सोडवतील.  तुम्हाला फक्त तुमच्या दिवसातून दोन मिनिट आमचे लेख नियमित वाचायचे आहेत. आम्ही कुठलीही फी मागत नाही. आमच्या फेसबुक पेज ला लाइक करा किंवा व्हाटसअप चैनल ला जॉइन करा. नॉटिफिकेशन सुरू ठेवा आणि तयार व्हा.. रोज थोडे वाचन.. रोज थोडा बदल करायला! 

ता. क. डॉ. वा. ब. राहुडकर लिखित "सूर्यफूल" या पुस्तकात "लागवड व्यवस्थापना" सोबत वाचा भरपूर समर्पक माहिती. घरपोच मिळवण्यासाठी इथे क्लिक करून ऑर्डर करा. धन्यवाद! 

Back to blog

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.

फसल को बर्बाद करने वाले पंछियों से बचे!

पेश है लाइट और आवाज करने वाला सौर उपकरण

अभी और जानकारी पाए!