आता तुम्ही सुद्धा मिळवू शकता - गाडी, बंगला आणि बनवू शकता मोठा बँक बॅलेन्स!
शेअर करे
भाजीपाला/तरकारी उत्पादक शेतकरी हा इतर शेतकरी बांधवांपेक्षा खूप वेगळा असतो. ऊसाची किंवा कपाशीची शेती करणारा शेतकरी वेगळा असतो. ही व्यापारी पीके असून त्यांचे ग्राहक ठोस असतात, भाव ठरलेला असतो, उत्पादकता अपेक्षित असते. पण तरकारी उत्पादक शेतकरी वेगळा ठरतो. त्याला चार-पाच प्रकारची पिके घ्यावी लागतात. लागवड व काढणीचा वेळ साधावा लागतो, बाजारातिल मागणीचा वेध घेत टप्याटप्यात लागवड व टप्याटप्यात काढणी करावी लागते. ताजा ताजा माल वेळीच बाजारात न्यावा लागतो, फारशी साठवणूक करता येत नाही.
तरकारी पिकात आर्थिक गुंतवणूक चांगली असते, मेहनत भरपूर असते, चपळता व व्यवहार कुशलतेची गरज असते. इतर पिका प्रमाणे या पिकात देखील नैसर्गिक आपत्ति व्यतिरिक्त, मंजूर व्यवस्थापन, दर्जा व्यवस्थापन करावे लागते पण त्या व्यतिरिक्त वाहन व्यवस्थापन, मार्केट व्यवस्थापन या कडे विशेष लक्ष्य द्यावे लागते. एकूणच तरकारीची शेती ही ऐऱ्यागैऱ्याची शेती नाही. या साठी प्रत्येक हंगामात, प्रत्येक पीक यशस्वी करून दाखवायची धमक ठेवावी लागते. पैसा खर्च करावा लागतो पण आपले भांडवल चुकीच्या जागी खर्च होणार नाही, अडकून पडणार नाही, याची काळजी घ्यावी लागते.
हीच बाब लक्षात घेऊन आम्ही तरकारी उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही विशेष लेख माला घेऊन आलो आहोत. साध्या, सोप्या भाषेत लिहिलेली ही लेख माला नियमित प्रमाणे प्रकाशित होणार आहे. याचे सर्व भाग आपण आमच्या फेसबुक पेज वर, व्हाटसअप चॅनलवर व बेबसाईटवर वाचू शकतात.
या लेख मालेच्या माध्यमातून आपल्याला पिकांची निवड, जातींची निवड, मातीची तयारी, लागवडीची पद्धत, सिंचन, अन्नद्रव्य व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड-रोग व्यवस्थापन, काढणी व्यवस्थापन, काढणी पश्चात प्रक्रियेची साधने, मार्केट व्यवस्थापन, दळण-वळण व्यवस्थापन, आर्थिक व्यवस्थापन अश्या विविध बाबींवर सांगोपांग चर्चा वाचायला मिळेल.
मित्रहो, अनेक शेतकरी पिढ्या अन पिढ्या तरकारीची शेती करत आहेत. थोडे सोडले तर इतर बहुतेक शेतकरी एक वैफल्यग्रस्त जीवन जगत आहेत. भांडवलाचा अभाव, नुकसान, कर्ज अश्या दूषचक्रात फसलेले आहेत. धरले तर चावते आणि सोडले तर पळते अशी अवस्था असून भाजीपाला शेती बद्दल अनास्था निर्माण झाली आहे.
अनेकांनी आपल्या शेतजमिनी विकून टाकल्या. शहरात जाऊन राहू लागले. यातून त्यांना सुख आलेले आहे का? अजिबात नाही. म्हणूनच अनेक शहरी तरुण पुन्हा एकदा शेती कडे वळू लागले आहेत.
जर तुम्ही तरकारी उत्पादन घेत असाल पण त्यातून आपल्या साठी चांगली मिळकत होत नसेल तर आमची ही लेख माला नियमित पणे वाचा. प्रत्येक लेख वाचायला दोन ते तीन मिनिट पुरे ठरतील. प्रत्येक लेखातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे आपण नियमित पणे आपल्या शेती पद्धतीत व नियोजनात सुधारणा करू शकाल. चुकीच्या धारणांना बगल देत, विवेकपूर्ण शेती करत प्रगती साधाल. प्रत्येक हंगामात तुम्हाला पूर्वी पेक्षा अधिक लाभ मिळेल, आनंद मिळेल.
आपल्या भोवताली बघा. आपल्याला असे काही शेतकरी दिसून येतील ज्यांनी उत्तरोउत्तर प्रगती केली आहे. कोरडवाहू तुकड्यावरून सुरुवात करत आज मोठी मजल मारली आहे. त्याच्या यशाचे रहस्य थोडे थोडके नाही. त्यांना काही जादूचा दिवा सापडलेला नाही. त्यांची विचार करण्याची पद्धत, कृती करण्याची पद्धत वेगळी आहे. ते कोणत्याही चुकीच्या धारणेत अडकलेले नाहीत. तुम्ही सुद्धा हे साध्य करू शकता. नवीन ज्ञान तुम्हाला संकटा पासून वाचवेल, संकटाचा सामना करायला शिकवेल, काळ्या आईची सेवा करता करता सुखी व्हायला मदत करेल. पैसा अडका जमवायला मदत करेल.
मित्रहो या साठी तुम्हाला फक्त तुमच्या दिवसातून दोन मिनिट आमचे लेख नियमित वाचायचे आहेत. आम्ही कुठलीही फी मागत नाही. आमच्या फेसबुक पेज ला लाइक करा किंवा व्हाटस् आप चैनल ला जॉइन करा. नॉटिफिकेशन सुरू ठेवा आणि तयार व्हा.. रोज थोडे वाचन.. रोज थोडा बदल करायला!






