प्लेसिवा - मिरची साठी एक दुहेरी कीटनाशक
शेअर करा
प्लेसिवा: मिर्चीच्या काढणीच्या काळात रसशोषक किडी आणि फळ पोखरणाऱ्या किडीचे नियंत्रित करण्यासाठी एक डबल पॉवर कीटकनाशक.
मिर्ची काढणीच्या काळात असतांना कीटकनाशक निवडणे कठीण असते, कारण चाचणीदरम्यान कीटकनाशक अवशेष आढळून आला तर निर्यात नाकारली जाऊ शकते.
अश्या वेळी प्लेसीवा हा सर्वोत्तम पर्याय आहे, कारण शेतकरी फवारणी केल्यानंतर 5 दिवसांनी मिर्चीची काढणी परत सुरू करू शकतात. प्लेसीवात सायन्ट्रानिलीप्रोल ७.३% आणि डायफेनथिऊरॉन ३६.४% या दोन ब्रॉड-स्पेक्ट्रम कीटकनाशकांचा समावेश आहे.
सायन्ट्रानिलीप्रोल हे एक नवीन एन्थ्रानिलिक डायमाइड कीटकनाशक आहे जे पाने खाणाऱ्या आणि रसशोषण करणाऱ्या किडीच्या विस्तृत श्रेणीविरुद्ध प्रभावी आहे. हे एक प्रणालीगत कीटकनाशक आहे जे पोटविष आणि स्पर्शीय मार्गाने प्रभाव दाखवते.
डायफेनथिऊरॉन हे एक गैर-प्रणालीगत कीटकनाशक आणि कोळीनाशक आहे जे स्पर्श आणि/किंवा पोटविष म्हणून पिले आणि वयस्कांना मारते. हे ट्रांसलैमिनर गतिविधी प्रदर्शित करते, ज्याचा अर्थ पानांच्या खालच्या बाजूला असलेले कीटकही नियंत्रित होतात.
प्लेसीवा ची शिफारीश:
- कापूस पिकातील तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, मावा आणि गुलाबी बोंड अळी.
- मिरची मध्ये फूलकिडे, कोळी, पांढरी माशी आणि फळ पोखरणारी अळी.
डोस: 1.25 मिली प्रति लीटर पाणी.
लक्ष्य असू द्या: कीटकनाशकच्या लेबलवर दिलेल्या सूचनांचे नेहमी काळजीपूर्वक पालन करा.





