Soil testing kit
Skip to product information
1 of 7

Black Cat

ब्लॅक कॅट उंदीर सापळा

ब्लॅक कॅट उंदीर सापळा

उंदीर तुमच्या घर, गोदाम, गोठा, खळे व शेतात  धुमाकूळ घालत आहेत का? 

उंदीर ही एक मोठी समस्या आहे. लक्ष्य दिले नाही तर दिवसेंदिवस वाढत जाते. उंदीर संख्या वेगाने वाढते. त्यांचे अनेक प्रकार असतात व प्रत्येक उंदीर हुशार देखील असतो. त्यामुळे त्यांच्या नियंत्रणासाठी एखादी पद्धत उपयोगी नसते. आपल्या या वेबसाइट वर उंदीर नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धतीं सोबतच त्यासाठी लागणाऱ्या उत्पादनांची माहिती देखील आपण देत आहोत. आपण ती अवश्य वाचावी. या ठिकाणी मी आपल्याला उंदीर मारायच्या प्रभावी, दमदार ब्लॅक कॅट सापळ्याची माहिती देत आहे. 

सादर करत आहोत - "ब्लॅक कॅट हाय सेन्सिटिव्हिटी क्विक ट्रॅप"  - उंदरांना जलद आणि मानवीय पद्धतीने नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेला एक क्रांतिकारी उपाय.  हा ट्रॅप तुमच्या पिकांसाठी, पशुधनासाठी आणि पर्यावरणासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

इतर पद्धती पेक्षा हा ब्लॅक कॅट सापळा वेगळा आहे:

  • विषमुक्त: धन धान्य दूषित होण्याचा धोका न बाळगता उंदीर नष्ट करा.
  • उच्च संवेदनशील ट्रिगर: जलद आणि निर्णायक कारवाई सुनिश्चित करतो .
  • टिकाऊ, गंज-प्रतिरोधक डिझाइन: वर्षानुवर्षे टिकेल असे बनवलेले, विश्वसनीय संरक्षण प्रदान करते.
  • अद्वितीय डिझाइन: मजबूत धातूचा किल बार, केच पिन, बेट स्पाइक आणि सुरक्षित पकड यंत्रणा.
  • अनेक प्रकारच आमिष वापरू शकता: खोबरे, चिक्की, फळे, किंवा मांस आमिष म्हणून वापरू शकता.

ब्लॅक कॅट सापळ्याचे पार्ट्स आणि त्यांचा उपयोग 

  • बेट स्पाईक  (Bait Spike): यात आपण वापर असलेले आमिष अडकवा जेणेकरून उंदीर याचा हळवेल व सापळा पडेल.
  • किल बार (Kill Bar): उंदीर जलद आणि प्रभावीपणे, एकाच फटक्यात मारला जाण्यासाठी मानवी उपाय.
  • कॅच पिन (Catch Pin): किल बार सापळा ट्रीगर होई पर्यन्त  किल बार धरून ठेवतो,. 
  • किल एरिया / बेट ट्रफ (Kill Area/Bait Trough):  इथे आपण वापरत असलेल्या अमीषाचे छोटे तुकडे टाकावे जणे करून उंदीर ते खाऊन बेट सपाईक मध्ये अडकवलेला तुकडा खाण्यासाठी सरसावेल.

ब्लॅक कॅट उंदीर सापळा कसे कार्य करते?

खोबऱ्याच्या तुकडयात बेट स्पाईक अडकवा. किल बार च्या पूल बार रा बोटाने ओढून कॅच पिन मध्ये अडकवा. मागच्या बाजूने उचलुन सापळा हवा तिथे, उंदरांच्या रस्त्यात ठेवा. किसलेल्या खोबऱ्याचे थोडे तुकडे अडकवलेल्या अमीषा भोवती टाका. निवांत वतावरण झाल्यावर खोबऱ्याच्या वासाने उंदीर आकर्षित होतो व मारला जातो. 

'हा सापळा खात्रीशीर आहे! माझ्या घर, गोठ्यातून आणि शेतातून उंदीर कमी करण्यासाठी मी याचा उपयोग शेकडो वेळा केला आहे. उपयोग करते वेळी मी तीच्या भोवती लक्ष्मण रेषा मारतो जेणेकरून खोबऱ्याला मुंग्या लागू नये. उंदीर असला तर एक तर रात्र भरात किंवा फार तर तीन दिवसांत तो सापळ्यात अडकतोच - अनिल राठी.

ब्लॅक कॅट उंदीर सापळा वापरुन निश्चिंत होणाऱ्या हजारो शेतकऱ्यांमध्ये सामील व्हा.!

९,००० हून अधिक समाधानी खरेदीदारांनी ब्लॅक कॅट ट्रॅपला ४.३ स्टार रेटिंग दिले आहे! ते त्याच्या मजबूत बनावट, अचूक रचना आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या, गंज-मुक्त भागांबद्दल प्रशंसा करतात. आपण स्वतः हा अनुभव घ्या.

आमचा सूचनात्मक व्हिडिओ पाहून सापळा कसा लावायचा आणि त्याला कसे आमिष लावायचे याबद्दल अधिक जाणून घ्या.

    तुमच्या धन-धान्याचे रक्षण करा आणि आजच घर, गोदाम, गोठा, खळे आणि शेत  सुरक्षित करा! ब्लॅक कॅट हाय सेन्सिटिव्हिटी क्विक एक्शन  ट्रॅप मिळवण्यासाठी येथे क्लिक करा आणि ९,०००+ समाधानी वापरकर्त्यांमध्ये सामील व्हा. 

    उंदरांना तुमचे नास धुस करू देऊ नका. आत्ताच ऑर्डर करा आणि निश्चिंत व्हा!!

    View full details
    akarsh me

    Join Our WhatsApp Channel

    Stay updated with our latest news and content.

    Join Our WhatsApp Channel
    cow ghee price
    itchgard price