Soil testing kit
Sugarcane pest control in two minutes!

उसावरील कीड नियंत्रणाची माहिती फक्त दोन मिनिटांत

ऊसावर अनेक किडी येतात. वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या किडी ऊसावर आणि शेतकऱ्यांच्या खिशावर डोळा ठेवतात. चला तर मग या किडींना ओळखूया!

  • कांडी अळी (Shoot Borer)
  • शेंडा पोखरणारी अळी (Top Borer)
  • खोड पोखरणारी अळी (Stalk Borer)
  • मूळ पोखरणारी करणारा अळी (Root Borer).
  • लोकरी मावा
  • पांढरी माशी
  • काळी माशी
  • थ्रीप्स
  • टोळ
  • कोळी
  • वाळवी
  • गांधील माशी

ही यादी तर खूप मोठी आहे, पण इथे फक्त जास्त त्रासदायक किडींची नावं दिली आहेत.

यादी कितीही मोठी असो आणि किडी कितीही उपद्रवी असो, शेतकरी जर मनाशी ठाम असेल तर कोणतीही कीड ऊसाला हानी पोहोचवू शकत नाही.

कीड नियंत्रणाचा मूलमंत्र : 'अतिरेक टाळा'

इतक्या मोठ्या आणि बऱ्याच दिवस टिकणाऱ्या पिकात किडी असणारच. आपल्याला फक्त त्यांची संख्या नियंत्रणात ठेवायची आहे. कोणतीही कीड एवढी वाढू देऊ नका की ती नुकसान दायक ठरेल

किडींचा अड्डा उद्ध्वस्त करा:

ऊस सोडून किडींना इतर कुठे राहता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तण म्हणजे किडींचं ‘पंचतारांकित हॉटेल’ जेव्हा शेतात पीक नसतं. तण शेतातून आणि बांधावरून काढून टाका. कधीच उगवू देऊ नका. ऊसात तण नियंत्रणासाठी 'केलेरिस एक्स्ट्रा' वापरता येईल. यात मेसोत्रियोन आणि अ‍ॅट्राझिन ही दोन औषधे असतात जी झाडात शिरून पसरतात. तीन किंवा चार पानांच्या तणांवर हे औषध चांगलं काम करतं आणि बऱ्याच दिवसांपर्यंत तण होऊ देत नाही. पिकावर याचा थोडासा विपरीत परिणाम होऊ शकतो, पण तो लवकरच निघून जातो आणि पीक पूर्ववत होते. १४०० मिली प्रति एकर या प्रमाणात वापरायचं. ७ मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फ्लड जेट किंवा फ्लॅट फॅन नोजलच्या नेपसेक स्प्रेअरने तणांवर फवारा. यासोबत दुसरं कोणतंही औषध वापरू नका.

शत्रूच्या शत्रूला आपला मित्र बनवा. प्रत्येक किडीचा कोणी ना कोणी शत्रू असतोच, त्यांना आपल्या शेतात आसरा द्या. ते आपलं काम करत राहतील. वर दिलेल्या यादीतील किडी त्यांच्या आयुष्याचा काही काळ जमिनीखाली घालवतात. जर आपल्या मातीत त्यांना आजारी करणारी बुरशी असेल तर ती या किडींची संख्या नियंत्रणात ठेवेल.

बारकाईने निरीक्षण करणे हा एका कुशल शेतकऱ्याचा महत्त्वाचा गुण आहे. पिकात सापळे आणि आमिषं वापरायला विसरू नका. चिकट सापळे, प्रकाश सापळे, फेरोमोन सापळे, आणि गुळ-विनेगर-विष यांच्या मिश्रणाने बनवलेले आमिष वापरा. यात सापडणाऱ्या किडींचे प्रकार आणि संख्या एका डायरीत लिहून ठेवा आणि त्यात काही बदल होतोय का ते बघत रहा.

पिकासाठी माती तयार करताना मातीत घालण्याच्या औषधांचा बेसल डोसमध्ये वापर करा. यामुळे पिकाला सुरुवातीलाच संरक्षण मिळतं आणि ते जोमदार बनतं. मग किडी जरी आल्या तरी त्यांना पिकावर हल्ला करणं अवघड जातं.

योग्य प्रमाणात खते वापरून पिकाला पोषक आहार मिळाला की त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. नत्र छोट्या छोट्या हप्त्यात दिल्यास जास्त फायदा होतो. एकदम सगळं नत्र दिल्यास पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींची संख्या वाढते.

जेव्हाही रासायनिक कीटकनाशक वापरायचे असतील तेव्हा अत्याधुनिक कीटकनाशक निवडा. जुनी कीटकनाशके परिणाम दाखवत नाहीत. शक्य असल्यास दोन कीटकनाशकांचे संयुक्त सूत्र वापरा. ही दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करतात आणि त्यांचा एकत्रित परिणाम खूप चांगला असतो.

तुमचे प्रश्न कमेंट मध्ये विचारा, आणि हा लेख इतरांनाही शेअर करायला विसरू नका.

Back to blog

2 comments

Aphids treatment in sugarcane

Pawan Baliyan

Good

Pawan Baliyan

Leave a comment

Please note, comments need to be approved before they are published.

Join Our WhatsApp Channel

Stay updated with our latest News, Content and Offers.

Join Our WhatsApp Channel
akarsh me
cow ghee price
itchgard price

नासधूस करणाऱ्या पक्षांच्या थव्यापासून वाचवा आपके पीक!

सादर आहे पक्षी उडवणारे आवाज व प्रकाशावर आधारित सौर उपकरण

अधिक माहिती मिळवा!