
हुमणी : पिकांसाठी धोका आणि नियंत्रण रणनीती
शेअर करा
मातीखाली लपलेली हुमणी (white Grub), ही एक जाड-जुड क्रीम कलर ची अळी आहे जी दिसायला निरुपद्रवी वाटू शकते पण प्रत्यक्षात अतिशय घातक कीड आहे. ही शेण किडयाची अळी अवस्था असून मातीत राहून उभ्या पिकाची मुळे खणारी धोकेदायक कीड आहे. विविध प्रकारच्या पिकात ही मोठ्या प्रमाणात नुकसान करते.
विनाशाचा दीर्घ इतिहास
हुमणी गेल्या अनेक दशकांपासून भारतीय शेतीत विध्वंस करीत आहे. सुरुवातीला ऊस आणि भुईमूग या पिकात मोठा फटका बसत असे पण आता या किडी ने इतर पिकांची मुळे खायला सुरवात केळी असल्याने, फळभाज्या, डाळी, धान्ये आणि इतर पिकांचे देखील मोठे नुकसान करते. आज देशातील सर्वात विनाशकारी किट म्हणून हुमणी ला ओळखले जाते.
हुमणीचे जीवनचक्र
कीड बहुरूपी असते. तिच्या जीवनचक्रात अनेकदा आपले रूप बदलवते त्यामुळे तिला ओळखण्यात गफलत होऊ शकते. जर आपण किडीच्या जीवनचक्राचा नीट अभ्यास केला तर तिला ओळखायला तर मदत मिळतेच शिवाय या माहितीचा किफायतशीर पद्धतीने व चोख नियंत्रण करायला देखील उपयोग होईल.

- अंडी अवस्था: प्रौढ भुंगेरे बहुतेकदा पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीत अंडी घालतात. ७ ते १० दिवसांत अंडी उबतात.
- हुमणी अवस्था (विनाशकारी टप्पा): अंड्यातून हुमणी बाहेर पडते. ही अतिशय खादाड असते त्यामुळे त्रासदायक ठते. भरपूर मुळे खायला भेटली तर ही पटापट मोठी होते. या काळात ते अनेकदा कात टाकते.
- निद्रा अवस्था: भरपूर खाऊन झाल्यावर व पूर्ण वाढ झाल्यानंतर, हुमणी स्वत: भोवती कोष बनवते व निद्रिस्त होते. ही अवस्था ३० दिवसाची असते.
- प्रौढ बीटल अवस्था: कोषातून प्रौढ भुंगे बाहेर पडतात. त्यांचे आयुष्य सुमारे १ महिना असते. हे भुंगे मिलन करतात आणि अंडी घालतात. एक जोडी ५० ते १०० अंडी घालते त्यामुळे जमीनिखालील हुमणी अवस्थे ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.
हुमणीचा प्रादुर्भाव का वाढतोय?
आधुनिक काळात हुमणीचा प्रादुर्भाव वाढायची अनेक करणे आहेत. जसे
- एक पीक पद्धती: वर्षानुवर्षे एकच पीक पुन्हा पुन्हा लावणे व पिकाचे क्षेत्र वाढवणे यामुळे हुमणीचे जीवनचक्र कोणत्याही व्यत्ययाशिवाय लागोपाठ चालते व प्रत्येक वेळी तिची संख्या चक्रवाढ पद्धतीने वाढत जाते.
- कीटकनाशकांचा अतिवापर: ब्रॉड-स्पेक्ट्रम (एकाच वेळी खूप किटकावर परिणाम करणारे) कीटकनाशकांचा जास्त वापर केल्याने हुमणीवर जगणार्य मित्र किटकांचा व मित्र बुरशीचा नाश होतो. त्यामुळे हुमणी ला कोणतीही अडचण शिल्लक रहात नाही.
- हवामान बदल: हवामानातील बदल, अनियमित पाऊस आणि तापमानातील चढउतार यामुळे हुमणीच्या विकासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते.
- मातीचे खराब आरोग्य: पूर्वी मातीतील सेंद्रिय घटक 2 ते 3 टक्के होता आता तो 0.1 ते 0.2 टक्के इतकाच शिल्लक आहे. सेंद्रिय पदार्थांची कमतरता असली तर हुमणी ला फक्त पिकांची मुळेच खावी लागतात त्यामुळे पिके हुमणीला अधिक संवेदनशील होतात.
हुमणीचा सामना करण्यासाठी एकात्मिक कीटक व्यवस्थापन (IPM)
चांगली बातमी अशी आहे की हुमणीचा प्रतिकार करण्याचे मार्ग आहेत! एकात्मिक कीटक व्यवस्थापन (IPM) हुमणी चे शाश्वत नियंत्रण करण्यासाठी उपयुक्त आहे व विविध पद्धती केल्यावर दीर्घकालीन यश मिळते:
१. प्रतिबंधात्मक उपाय:
- पीक फेरपालट: अळ्यांना आवडणारी पिके आणि नको असलेली पिके आलटून पालटून घेतल्याने त्यांच्या अन्नपुरवठ्यात व्यत्यय येतो व प्रजनन चक्र खंडित होते.
- शेताची स्वच्छता: पिकाच्या काढणीनंतर पिकांचे अवशेष आणि तण काढून टाका. हे हुमणीला आश्रय देतात ज्यामुळे प्रजनन वाढते.
- निरोगी मृदा: कंपोस्ट किंवा पूर्ण कुजलेले सेंद्रिय पदार्थ वापरून मातीचे आरोग्य वाढवा. यामुळे नैसर्गिक भक्षकांसह (मित्र किटकांचा व मित्र बुरशी) एक समृद्ध परिसंस्था तयार होते जी हुमणीला नियंत्रणात ठेवते.
२. देखरेख:
- प्रकाश सापळे: मे-जून मध्ये भुंगे सक्रिय असतात तेव्हा प्रकाश सापळे वापरून प्रौढ भुंग्यांना आकर्षित करून कीटकनाशक युक्त पाण्यात मारले जाऊ शकते. यामुळे उपद्रवाची तीव्रता जाणून घेण्यास कमी करण्यास मदत होते.

- मातीचे परीक्षण करणे: हुमणीचे अस्तित्व तपासण्यासाठी वेळोवेळी मातीचे नमुने खोदून तपासावे.
३. नियंत्रण उपाय:
- सांस्कृतिक पद्धती: उन्हाळ्यात खोलवर नांगरणी केल्याने हुमणी उघडी पडते आणि तिला पशू - पक्षी खाऊन टाकतात, ज्यामुळे संख्या बऱ्याच प्रमाणात कमी होते.
- जैविक नियंत्रण: एंटोमोपॅथोजेनिक (कीटकभक्षि) नेमाटोड किंवा मित्र बुरशी सारख्या नैसर्गिक शत्रूंचा उपयोग केला जाऊ शकतो. मेटारिझियम अॅनिसोप्लिया हुमणीमध्ये महामारी पसरवते ज्यामुळे जैविक नियंत्रण शक्य होते.
- रासायनिक नियंत्रण: शेवटचा उपाय म्हणून, केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समिती (CIB&RC) ने मान्यता दिलेल्या कीटकनाशकांचा वापर करण्याचा विचार करा. तथापि, त्यांचा वापर विवेकीपणे आणि कृषी तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच करा.
CIB&RC द्वारे नोंदणीकृत कीटकनाशकांची (हुमणी मारणारी) सारणी
सक्रिय घटक | सूत्रीकरण | ब्रँड नावे |
---|---|---|
कार्बोफुरन ३% सीजी | ग्रॅन्यूल, बेसल डोससह घाला | नागार्जुन फ्युरी, अदामा कार्बोमेन |
थायमेथोक्साम ०.४% + बायफेन्थ्रिन ०.८% जीआर | ग्रॅन्यूल, बेसल डोससह घाला | आयआयएल टर्नर |
Fipronil 40% + Imidacloprid 40% WG | पाण्याने पसरणारे कण, ठिबक सिंचन किंवा आळवणीद्वारे वापरा |
इफको शिरसागी, कात्यायनी नाशक , बीएसीएफ एंडटास्क |
पायराक्लोस्ट्रोबिन ३.५% + थिराम १५.०% + क्लोथियानिडिन २२.५% एफएस | बियाणे प्रक्रिया | जीएसपी पीसीटी ४१०, सुदर्शन सिट्रम |
थायामेथोक्सम ०.०९०% + फिप्रोनिल ०.०२०% w/w GR | ग्रॅन्यूल, बेसल डोससह घाला | क्रिस्टल व्होल्टॅक्स, मॅनकाइंड थायकाइंड-एफ |
आपल्याला या लेखातून उपयुक्त माहिती मिळाली का? हा लेख वाचून आपण हुमणी नियंत्रणा साठि अधिक दर्जेदार व किफायती रणनीती आखू शकणार आहात का? लेख आवडला असेल तर लेख शेअर करायला विसरू नका. नवीनतम अपडेट्ससाठी WhatsApp वर ResetAgri शी कनेक्ट रहा. तुमच्या वेळेबद्दल धन्यवाद!