Soil testing kit
Taking Care of Our Soil: The Key to Good Farming

धडे सक्रिय पीक व्यवस्थापनाचे : सक्रीय मृदा व्यवस्थापन

आजकाल 'मृदा विरहित शेती' (Soil-less farming) किंवा 'हायड्रोपोनिक्स' (Hydroponics) सारख्या नवीन संकल्पना ऐकायला मिळत असल्या तरी, आपल्या पारंपरिक शेतीतील मातीचे महत्त्व कणभरही कमी झालेले नाही आणि भविष्यातही होणार नाही. माती ही केवळ पिकांना आधार देणारी नाही, तर ती एक जिवंत व्यवस्था आहे, ज्यामध्ये अब्जावधी सूक्ष्मजीव आणि पोषक तत्वांचा एक गुंतागुंतीचा संसार असतो. गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांचा अतिवापर, भरमसाट उत्पादन देणाऱ्या पिकांच्या जातींचा (High-Yielding Varieties) अयोग्य वापर आणि एकापाठोपाठ एक घेतली जाणारी पिके यामुळे जमिनीतील पोषक द्रव्ये आणि सेंद्रिय कर्बाचा (Organic Carbon) मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे.

नत्र (Nitrogen), स्फुरद (Phosphorus), पालाश (Potassium), कॅल्शियम (Calcium) यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचे संतुलन पूर्णपणे बिघडले आहे. सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवसृष्टी (Microbial Life) नष्ट झाली आहे, जी जमिनीच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

टिलर किंमत

शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास, जमिनीचे भौतिक (Physical), रासायनिक (Chemical) आणि जैविक (Biological) गुणधर्म हरवले आहेत, ज्यामुळे पिकांना आधार देण्याची आणि त्यांना आवश्यक पोषण देण्याची तिची नैसर्गिक क्षमता पूर्णपणे नष्ट झाली आहे. ही मृतप्राय जमीन आपल्या शेतीचा कणाच मोडून काढत आहे.

या मृतप्राय जमिनीला पुन्हा जिवंत करण्यासाठी आपल्याला नव्याने सक्रिय आणि शाश्वत व्यवस्थापन करावे लागेल. या व्यवस्थापनात जमिनीचे शोषण थांबवणे (Stopping Exploitation) हे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी खालील गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत आणि त्या केवळ तात्पुरते उपाय नसून, दीर्घकालीन दृष्टिकोन आहेत:

पीक फेरपालट करणे (Crop Rotation): एकाच प्रकारचे पीक वारंवार न घेता पिकांची अदलाबदल करणे हा जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे. उदा. कडधान्य पिके (Legumes) जमिनीत नत्राचे स्थिरीकरण करतात, तर काही पिके जमिनीतील खोलवरचे पोषक तत्वे वर आणण्यास मदत करतात. यामुळे जमिनीतील पोषक तत्वांचे संतुलन राखले जाते आणि मातीचा थकवा दूर होतो. 

दर्जेदार बियाणे निवडणे (Choosing Quality Seeds): केवळ अधिक उत्पादनाऐवजी थोडे कमी पण दर्जेदार उत्पादन देणाऱ्या, रोगप्रतिकारक आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या बियाण्यांची निवड करणे महत्त्वाचे आहे. देशी वाण (Indigenous Varieties) आणि सुधारित वाण यांचा योग्य वापर केल्याने रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते आणि जमिनीवरील ताणही कमी होतो.

मृदापरीक्षणावर आधारित खते वापरणे (Soil Test Based Fertilization): जमिनीच्या गरजेनुसार, माती परीक्षण करूनच संतुलित रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनावश्यक आणि अतिरिक्त खतांचा वापर टाळल्याने जमिनीचे आरोग्य सुधारते आणि उत्पादन खर्चही कमी होतो. माती परीक्षणामुळे कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे, हे अचूकपणे समजते आणि त्यानुसार खतांची मात्रा ठरवता येते.

हिरवळीची पिके माती आड करणे (Green Manuring): जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी हिरवळीची पिके (उदा. धैंचा, ताग, मूग, चवळी) घेऊन ती फुलोऱ्यावर येण्यापूर्वी जमिनीत गाडणे हा एक उत्कृष्ट उपाय आहे. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, पाण्याची साठवण क्षमता सुधारते आणि जमिनीची पोत (Soil Texture) सुधारण्यास मदत होते.

सेंद्रिय खतांचा वापर (Application of Organic Manures): पूर्ण कुजलेले शेणखत (Farm Yard Manure), शहरी कंपोस्ट (City Compost), गांडूळ खत (Vermicompost) आणि बोन मिल (Bone Meal) यांचा नियमित वापर करून प्रत्येक हंगामासोबत जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवणे आवश्यक आहे. सेंद्रिय खते जमिनीतील सूक्ष्मजीवांसाठी अन्न पुरवतात, ज्यामुळे जमिनीतील जैविक क्रियाशीलता वाढते आणि पोषक तत्वांची उपलब्धता सुधारते.

पाण्याचा योग्य वापर (Efficient Water Management): अति सिंचनामुळे जमिनीतील पोषक तत्वे वाहून जातात आणि जमिनी क्षारपड होऊ शकतात. ठिबक सिंचन (Drip Irrigation), तुषार सिंचन (Sprinkler Irrigation) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. यामुळे पाण्याची बचत होते आणि जमिनीचे आरोग्यही टिकून राहते.

जमिनीची धूप थांबवणे (Erosion Control): वाऱ्याने किंवा पाण्याने होणारी जमिनीची धूप थांबवण्यासाठी समतल मशागत (Contour Cultivation), बांधबंदिस्ती (Bundling), मल्चिंग (Mulching) आणि योग्य झाडे लावणे यांसारख्या उपायांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. जमिनीची धूप थांबल्याने मातीतील पोषक तत्वे वाहून जाण्यापासून वाचतात.

जर आपण हे उपाय केले नाहीत, तर भविष्यात आपल्याला मातीविना होणाऱ्या पण अतिशय महागड्या शेतीकडे वळावे लागेल आणि त्यामुळे शेतीचे अर्थकारण आणखीनच बिघडेल. पारंपरिक आणि शाश्वत शेती हीच आपल्या शेतकऱ्यांचे भविष्य घडवू शकते. या लेख मालेच्या पुढील काही भागात आपण वर दिलेल्या प्रत्येक विषयावर  विस्तृत चर्चा करणारच आहोत.

पिकांची वाढ खुंटली आहे आणि फुलं लागत नाहीत?

पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे तुमची रोपं रोगांना बळी पडत आहेत का? टाटा रॅलिगोल्ड तुमच्या पिकांना मजबूत आणि विस्तृत मूळ प्रणाली (Root System) विकसित करण्यास मदत करते, ज्यामुळे खालील फायदे मिळतात:

  • 🌱 अधिक पोषक तत्वे आणि पाण्याची उपलब्धता
  • 💧 दुष्काळ सहन करण्याची क्षमता वाढवते
  • 💪 पिकांचे आरोग्य आणि ताकद वाढवते
  • 🌸 अधिक आकर्षक फुले आणि हिरवीगार पाने

आजच **टाटा रॅलिगोल्ड** वापरून आपल्या शेतीला नवी संजीवनी द्या!

आता खरेदी करा!

मृदा आणि पीक व्यवस्थापन: एक अविभाज्य नाते

शेतकरी मित्रहो, मृदा व्यवस्थापण (Soil Management) आणि पीक व्यवस्थापन (Crop Management) हे वेगवेगळे नाहीत, तर ते एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत हे समजाऊन घेणे अत्यंत आवश्यक आहे. गेली अनेक वर्ष प्रत्येक हंगामासोबत आपण आपल्या मृदेला कमजोर करत आलो आहोत. आणि आज ही मृदा मृत अवस्थेच्या कडेवर उभी आहे. आपण शेती थांबवून तिला वाचवू शकणार नाही, तर प्रत्येक हंगामासोबत आपल्याला आपल्या जमिनीला जीवदान द्यावे लागेल. वर सांगितलेल्या उपायांनी हे निश्चितपणे शक्य आहे. जमिनीला निरोगी ठेवणे हे केवळ चांगले उत्पादन मिळवण्यासाठी नाही, तर आपल्या भावी पिढ्यांसाठी एक सुपीक वारसा सोडण्यासाठीही महत्त्वाचे आहे. 

या लेखाच्या पुढील भागात आपण सक्रिय पद्धतीने पिकाची निवड कशी करावी, बाजाराची मागणी कशी ओळखावी आणि आपल्या शेतातून जास्तीत जास्त आर्थिक लाभ कसा मिळवावा यावर सविस्तर चर्चा करू. हा लेख आपल्याला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की लिहा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला प्रोत्साहन देतील. हा लेख आपल्या इतर शेतकरी बांधवांसोबत अवश्य शेअर करा. धन्यवाद!

Back to blog

Join Our WhatsApp Channel

Stay updated with our latest News, Content and Offers.

Join Our WhatsApp Channel
akarsh me
cow ghee price
itchgard price

नासधूस करणाऱ्या पक्षांच्या थव्यापासून वाचवा आपके पीक!

सादर आहे पक्षी उडवणारे आवाज व प्रकाशावर आधारित सौर उपकरण

अधिक माहिती मिळवा!