Skip to product information
1 of 6

Akarsh CL

आकर्ष सी एल शी आमची गट्टी, फळमाशीची करतो आम्ही सुट्टी!

आकर्ष सी एल शी आमची गट्टी, फळमाशीची करतो आम्ही सुट्टी!

फळमाशी चे सापळे बनवून बसवायची कटकट आता विसरा. कारण आम्ही घेऊन आलो आहोत अतिशय दमदार, प्रभावी व वापरायला अतिशय सोपा पर्याय - आकर्ष सी एल

काकडी, कारले, टरबूज, खरबूज, झुकीनि या पिकात फळमाशा मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. फुलोरा अवस्थे पासून तोंडणी होई पर्यन्त फळमाशी या फळांवर डंख मारत यात अंडी देत असते. या अंड्यातून तयार होणाऱ्या अळ्या फळे पोखरतात. त्यांनी केलेल्या घावावर बुरशी जगते व पूर्ण फळ वाया जाते. अनेक वेळी फळांवर डांखाचे डाग पडतात. फळे वेडी वाकडी वाढतात. 

ही समस्या फवारणी करून सुटत नाही शिवाय फूल अवस्थेत विषारी कीटकनाशकाची फवारणी केल्याने परागण करण्याऱ्या मधमशा मारल्या जातात.

आजपर्यन्त आपण या साठी प्लॅस्टिक सापळ्याचा उपयोग करत होतो. पण असे सापळे बसवणे अतिशय किचकट, वेळखाऊ असते. शिवाय सापळ्यातील गंधगोळी कमजोर झाली की परत फळमाशी चा सामना करावाच लागतो. 

पण आता आले आहे आकर्ष सीएल. जेल स्वरूपातील व क्युल्युअर युक्त आकर्ष सी एल वापरायला अगदी सोपे आहे. काडीच्या मदतीने या जेलचे छोटे छोटे ठिपके पिकाच्या वेलीवर ठीक ठिकाणी लावावे. या जेल मधून येणाऱ्या वासामुळे फळमाशी आकर्षित होऊन मारली जाते व तिचा प्रसार थांबतो. फळमाशी अंडे देऊ शकत नाही व आपली फळे सुरक्षित रहातात.   

  • आकर्ष सी एल  जसे वापरायला सोपे आहे तसे पर्यावरण पूरक आहे कारण याच्यामुळे प्लास्टीक चा वापर कमी होतो शिवाय मधमशीला देखील कोणताच धोका निर्माण होत नाही
  • आकर्ष-सी एल मध्ये क्युल्युअर ची मात्रा अधिक असल्याने ते अतिशय प्रभावी असून याचा प्रभाव दीर्घ काळ टिकतो.  
  • आकर्ष सीएल च्या जेल मध्ये क्युल्युअर चा वास एकसमान संथ गतीने सोडायची क्षमता असल्याने याचा प्रभाव वातावरणा नुसार दीर्घकाळ ठिकतो.   

आमचे वाचक आकर्ष सी एल ची खरेदी एमेझोन वरुन करून शकता. आमच्या लिंकवर क्लिक करून आपल्याला सूट, फ्री होम डीलीवरी, कॅश ऑन दिलीवरी व सुलभ हप्ते म्हणजे ईएमआय ची सुविधा मिळते.  

 

View full details