एप्रिल मध्ये कोणत्या पिकांची लागवड पाडेल पैशाचा पाऊस!
शेअर करा
रिसेटएग्री डॉट इन या वेबसाइट वरील माहितीपूर्ण लेखमालेत आपले स्वागत आहे. या लेखात भरपूर फायद्यासाठी एप्रिल मध्ये लागवडीचे नियोजन कसे करावे यावर चर्चा केली आहे. तुमच्याकडे चांगली माती, सिंचन करण्याची सोय, यश मिळवण्याची इच्छा आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल तर हा लेख आपल्याला भरपूर उपयोगी ठरेल. कमेन्ट सेक्शन मध्ये आपले मत मांडायला विसरू नका.
प्रथम आपल्या मनोधारणेला समजून घेऊ
कोणत्याही पिकाची लागवड करण्या पूर्वी, त्यात आपला पैसा, वेळ व मेहनत गुंतवण्या पूर्वी आपली मनोधारणा व मनोदशा समजावून घेणे गरजेचे आहे. बहुतेक भारतीय शेतकरी जास्तीत जास्त नफ्यासाठी शेती करत नाहीत; ते जगण्यासाठी शेती करतात. शेती हा जुगार नाही - यशासाठी शहाणपण, धोरण आणि योग्य कृती करणे आवश्यक आहे. 10% पेक्षा कमी शेतकरी ही मनोधारणा तयार करू शकता. जर तुम्ही आधीच त्या 10% मध्ये नसाल, तर प्रथम तुमचा दृष्टीकोन बदलवून घ्या. तरच तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमत्ते ने प्रयत्न करू शकाल.
निरोगी मृदा हा फायदेशीर शेती चा पाया आहे.
मातीची तयारी करणे ही पहिली पायरी आहे. तुमच्या मागील पिकाचे अवशेष काढून टाका (तुम्ही याचे रूपांतर मौल्यवान कंपोस्टमध्ये करू शकता!). माती पलटी करा आणि खाली दिलेली खते टाकून तिला समृद्ध करा:
- चांगले पूर्ण कुजलेले सेंद्रिय खत
- बेसल खते: संतुलित पोषणासाठी युरिया, डीएपी, एसएसपी, एमओपी, जिप्सम, कार्बोनेट, मॅग्नेशियम सल्फेट, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात टाका. त्यासाठी मृदा चाचणी करू शकता. खतांना देखील चांगले परखून घ्या.
लक्षात ठेवा, पिके निरोगी, पोषण घटकांनी समृद्ध मातीत जोमदार वाढतात!
एप्रिलमध्ये आले लागवड
एप्रिलच्या उत्तरार्धात आल्याची लागवड करण्याचा विचार करूया!
आले महत्वाचे मसाला पीक आहे. तो जशी ताटातील भाजीची लज्जत वाढवतो तसे औषधी फायदे देखील देतो. हे सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यासारख्या सामान्य आजारांपासून मुक्त होण्यास मोलाची मदत करतो.
हिंदी पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी आले लागवड ही योग्य आणि संभाव्य फायदेशीर संधी का हे यावर चर्चा करूया:
-
मातीची आवश्यकता: आले पीक चांगला निचरा होणाऱ्या, वालुकामय चिकणमातीत पीएच ६.० ते ६.५ दरम्यान असली तर चांगले वाढते. ही मातीची स्थिती हिंदी पट्ट्यातील अनेक भागात आढळते.
-
लाभाची शक्यता: आल्याला बाजारपेठेतील मजबूत मागणी आहे. योग्य मशागत पद्धतीमुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवसाय ठरू शकते.
कृपया लक्षात घ्या, यशस्वी आले लागवडीसाठी काळजी पूर्वक चांगले बेणे निवडणे, योग्य पद्धतीने लागवड करणे आणि एकात्मिक कीटक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. डॉ. एस.के. त्यागी लिखित " Improved Cultivation of Ginger ( आल्याची सुधारित लागवड पद्धत)" हे पुस्तक आले उत्पादन, सुधारित वाण, शेताची तयारी, लागवड तंत्र, सिंचन व्यवस्थापन, एकात्मिक पोषक व्यवस्थापन आणि एकात्मिक कीट रोग व्यवस्थापन यांच्याशी संबंधित नवीनतम तांत्रिक माहिती देते. मला आशा आहे की हे पुस्तक विस्तार अधिकारी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. सुदैवाने हे पुस्तक आमच्या शिपिंग पार्टनरकडे उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा !
कांदा पात लागवड
हिंदी पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी एप्रिलमध्ये पातीसाठी कांदा लागवड करणे फायद्याचे आहे. हे कमी गुंतवणुकीचे पीक आहे ज्याचे उत्तर भारतात उच्च बाजार मूल्य आहे. तुम्हाला कांदा तयार होण्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही. पातीचा पैसा करा. लवकर काढणी म्हणजे कीटकनाशके आणि इतर औषधाची आवश्यकता नाही. खर्च कमी. एप्रिलचे मध्यम तापमान चांगल्या वाढीला पोषक ठरते. या हंगामात कमी काळात चांगला फायदा मिळवण्या साथी कांदा पात लागवड करू शकता.
पत्ताकोबी आणि फुलकोबीची लागवड सावधगिरीने करा
हिंदी पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी पत्ताकोबी आणि फ्लॉवर ही पीके एप्रिल मध्ये लागवडीसाठी चांगली हेत! या भाज्यांना जास्त मागणी आहे, ज्यामुळे त्या चांगला नफा देण्याची शक्यता वाढते. पण लक्षात ठेवा, यासाथी चांगले जलसिंचन आणि सुरवंट (अळी) नियंत्रित करणे हे महत्त्वाचे आहे. आमचे शिपिंग भागीदार स्मार्ट सिंचन सोल्यूशन्स आणि क्लोराँट्रानिलिप्रोल आधारित आधुनिक कीटकनाशकांवर उत्कृष्ट ऑफर देत आहेत. त्याही बघा. योग्य काळजी घेतल्यास, पत्ताकोबी आणि फ्लॉवर, विशेषत: त्यांच्या विविध जाती, या हंगामात चांगला परतावा देऊ शकतात!
भेंडीची रोख कमाई!
भेंडी, ज्याला भिंडी किंवा लेडीज फिंगर म्हणूनही ओळखले जाते. सातत्याने मिळणारे चांगले भाव व तशीच सातत्यपूर्ण मागणी मूळे रोखीची कमाई होऊ शकते. चांगली बातमी? तुम्ही एप्रिलसह संपूर्ण वर्षभर भेंडीची लागवड करू शकता. काढणीसाठी पुरेसे मजूर उपलब्ध आहेत की नाही याची खातर जमा मात्र अगोदरच करून ठेवा!
वांग्यांना मोठी मागणी
वांग्यात येणाऱ्या शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळी चे नियंत्रण करा आणि भरपूर नफा कमवा! एप्रिल हा वांग्याच्या लागवडीसाठी महत्त्वाचा काळ आहे. यशस्वी काढणी साठी शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण प्रभावी पद्धतीने करणे फार आवश्यक आहे. चांगली काळजी घेतल्यास, एप्रिलमध्ये लागवड केलेली वांगी पावसाळ्यात भरपूर परतावा देऊ शकतात. जास्तीत जास्त नफ्यासाठी प्रति रोप 5-20 किलो वांग्याचे उत्पादन घेण्याचे लक्ष्य ठेवावे. आनंदाची बातमी अशी आहे की आमचे शिपिंग पार्टनर शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचे फेरोमोन ट्रॅप्स मोठ्या सवलतीत देत आहेत. त्यांना ऑर्डर करा आणि कीटकनाशकांवर होणारा खर्च वाचवा!
टोमॅटोच्या संधीचे सोने करा!
एप्रिल-मे मध्ये हरितगृहातील मातीचे सौरीकरण्या साठी टोमॅटोचे पीक काढून टाकले जाते. त्यामुळे खुल्या शेतात लागवडीसाठी सुवर्ण संधी उपलब्ध होते. गेल्या हंगामात भावात झालेल्या घसरणीनंतर अनेक शेतकरी संकोच करत असताना, जे धोरणात्मकरीत्या ही तफावत भरून काढतिल त्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची शक्यता आहे.
गवार: एप्रिलसाठी एक स्मार्ट पर्याय!
गवार अतिशय फायदेशीर पीक आहे. लागवडीचा खर्च कमी , सातत्यपूर्ण मागणी आणि मातीत होणारी सुधारणा असे तीन फायदे स्पष्ट जाणवतात. फायदेशीर आणि शाश्वत पिकासाठी योग्य माती असलेल्या शेतकऱ्यांनी एप्रिलमध्ये गवार लागवड करण्याचा विचार अवश्य केला पाहिजे.
उन्हाळी मिरचीसह दीर्घकालीन नफ्यात गुंतवणूक करा!
एप्रिलमध्ये लागवड केलेली मिरची 11-12 महिन्यांपर्यंत आवर्ती उत्पन्नाचा एक उत्कृष्ट स्त्रोत प्रदान करू शकते. बाजारपेठेला अनुकूल वाण निवडा आणि उत्तम परिणामांसाठी मातीची चांगली तयारी करा. ठिबक सिंचन, मल्चिंग आणि रोपांच्या बांधणी मध्ये गुंतवणूक करा.
वेलवर्गीय पिकसोबत नफा वाढवा!
दुधी, गोलभेंडी, कारले, काकडी आणि गिलके या उन्हाळी भाज्या उत्तम परतावा देत भरपूर विक्री जातात. त्या ठिबक सिंचनावर वाढतात आणि त्यांना किमान थोडाफार आधार द्यावा लागतो. निरोगी फळे सुनिश्चित करण्यासाठी फळ माशी नियंत्रण करा. फेरोमोन सापळे बसविण्याचे लक्षात ठेवा.
धडाडी च्या शेतकऱ्यांना मिळेल भरगोस नफा!
कोथिंबीर, मेथी, आणि पालक घेऊन तुमची एप्रिलची उत्पादकता वाढवा. ही एव्हर ग्रीन पिके तुमच्या मुख्य पिकात उत्तम प्रकारे वाढतात. चांगल्या वाढीसाठी मिनी-स्प्रिंकलर्स वापरुन उन्हाळ्याच्या उष्णतेवर मात करा आणि भरगोस नफा कमवा.
आम्हाला आशा आहे की हा लेख तुम्हाला उपयोगी ठरेल. केल्याने होत आहेरे आधी केलेची पाहिजे! तुमच्या एप्रिल महिन्यातील लागवडीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा!




