भाजी देशी असो वा विदेशी, यश मिळत नसतं.. खेचून आणाव लागतय
शेअर करा
लॉटरी च तिकीट काढून कुणी श्रीमंत होत नसत तस फक्त झुकीनि सारखी विदेशी भाजी पिकवून वन-टू-का फोर होत नाही! झुकीनि लागवड करत, वन टू का फोर करायचे कसे ते जाणून घ्या, फक्त दोन मिनिटांत
झुकेगा नहीं.. म्हणणारा पुष्पा असो की वन टू का फोर करणारा लखन! मला तर प्रत्येक तरुण शेतकऱ्यांत एक हीरो दिसतो! हवामान बदलांचा सामना करत, बाजाराचा चढ उतार समजाऊन घेत, व्यवाहर कौशल्य पणाला लावत जेव्हा एखादा सामान्य शेतकरी, प्रत्येक हंगामात, नफा मिळवायचे कसब अंगी बाणवतो तेव्हा तो एक हिरोच असतो! शेत शिवारात फक्त त्याचाच सिनेमा हिट असतो!!
झुकीनी लागवड (zucchini cultivation) नफा देईल का?
झुकीनि या विदेशी भाजीचे वैशिष्ठ्य म्हणजे बियाणे थोडे महाग असले तरी, लागवडीचा खर्च कमी आहे खुल्या शेतात, भरपूर प्रकाशात, वरंबे बनवून सरळ बी टोकून लागवड होते. सुरुवातीच्या वाढीसाठी, नंतर फुलोऱ्यासाठी, फळधारणेसाठी आणि फळ फुगवणि साठी खतांचे नियोजन करावे लागते. हे व्यवस्थापन काकडी वर्गीय पिका प्रमाणे करता येते फक्त झुकीनि चा वाढीचा वेग प्रचंड आहे व कालावधी कमी आहे, याचे भान ठेवावे. सुरुवातीला नागअळी , फुलावर आले की फळमाशी व शेवटी शेवटी पावडरी मिलडयू असे रोगकीड व्यवस्थापन असते. पंचवीस दिवसांत तोंडणी सुरू होऊन, रोज चे तोडे निघत, साठ ते पंचात्तर दिवसांत शेत रिकामे होते. काढणीसाठी घरची माणसे असली तर ते एकसारखा दिसणारा ए ग्रेड चा माल जास्त काढतात. दर वधारले की थोडा वेडा वाकडा, बी ग्रेड, चा माल सुद्धा चांगला भाव देतो.
फळ 6 ते 8 इंचीचे असतांना, जेव्हा अजून त्यात बी तयार झालेले नसते, झुकीनि काढणीची योग्य वेळ असते.
झुकीनिची बाजारपेठ (zucchini market) कुठे शोधाल?
झुकीनि म्हणजे दिसायला काकडी आणि चवीला गंगाफळ! हलका हिरवा, हिरवा आणि पिवळा असे तीन प्रकार आहेत. पिवळ्याला ला जास्त भाव मिळतो. स्वयंपाक करतांना या पासून टिक्का, फ्राय, सलाद, नूडल्स असे दिसायला आकर्षक व लज्जतदार पदार्थ बनवतात. आपल्याकडच्या प्रमाणे रस्साभाजी किंवा भरीत बनवत नसतात त्यामुळे याला पोळी खाण्यात फार विश्वास नसलेल्या मेट्रो सीटि मधील भारतीय हाय क्लास सोसायटी सोबत थ्री, फोर आणि फाईव स्टार हॉटेल मध्ये मागणी असते. कोविड नंतर भारतात पर्यटन व हॉटेल इंडस्ट्री वेगाने वाढत आहे. इडियन हॉटेल्स, आयटिसी हॉटेल्स, ईआयएच, चालेट, लेंमन ट्री, सायाजी, ताज जीव्हीके अशा मोठ्या हॉटेल शृंखला मध्ये भाज्या पुरवठा करणाऱ्या व्यापऱ्यांना या भाजीच्या पुरवठे दारांची गरज असते. नियमित व दर्जेदार पुरवठा लागतो. पर्यटन वाढीच्या काळात म्हणजे दिवाळी पासून मकरसंक्रांती पर्यन्त, इतर वेळे पेक्षा मागणी वाढते. ठोस दर प्रती किलो 25 ते 225 दरम्यान हिंदकोळे खातो.
झुकीनिच्या अंबेसेटर , ब्लेक ब्युटी, कॉस्टटा रोमेनस्को, दुजा, ऐटबॉल, फ्रेंच व्हाईट, गोल्ड रश, ग्रीन मशीन, सेनेक, स्पाईनलेस ब्युटी, स्पाईनलेस परफेक्शन अश्या व्हारायटी उपलब्ध आहेत.
एकतर ही नियमित भाजी नाही व मागणी सुद्धा वैशिष्ट्य पूर्ण असल्याने, नवा व उतावीळ शेतकरी बघून काही व्यापारी फसवू शतकात. रोजचे पेमेंट रोज हा नियम लाऊन, पांच-सहा व्यापारी हाताशी धरले तर फार फसवणूक होणार नाही. मागणी नुसार 10 ते 40 किलोच्या करुगेटेड बॉक्स मध्ये पेकिंग केले तर डेली ट्रेव्हल ने माल शहरात पाठवला जाऊ शकतो. किलोमागे 5 ते 6 रु वाहतूक खर्च हिशोब धरावा.
झुकीनिची विक्री फुटपाथवर होईल का?
मागणी घसरली व भाव पडले की लोकल मार्केट मध्ये, फुटपाथ वर बॅनर लाऊन, रेसिपीची झेरॉक्स देत, झुकीनि विकणारे तरुण अधून मधून दिसतात. हा माल देखील सहज खपतो कारण यू-ट्यूब वर रेसिपी बघून प्रयोग करणाऱ्या मध्यमवर्गीय हौशी सुगरणी दिवसेंदिवस वाढत आहेत. फुटपाथवर रहदारी नुसार ते 50 ते 100 किलो माल सहज जाऊ शकतो, भाव देखील 50 ते 100 सहज मिळेल. अश्या पद्धतीने झुकीनि विकते वेळी, दर काकडी पेक्षा 10-20रु जास्त ठेवावा.
झुकीनि विक्री साठी "फार्म तो फॉर्क" हा कॉन्सेप्ट यशस्वी होऊ शकतो का?
शहरात खाऊगल्ली, चौपाटी अशा पद्धतीने स्ट्रीट फूडच्या संकल्पनेत अनेक अजब-गजब खाद्य पदार्थ विक्री होतात. झुकीनि सारख्या विदेशी भाज्या वापरुन बनवलेली व्यंजने आपला ग्राहक वर्ग तयार करू शकतात. एकदा जमले तर फ्रेंचायजीच्या माध्यमातून “सुपर से उपर” धंदा होऊ शकतो. चुलीवरचा चहा, गुळाचा चहा चालू शकतो तर “विदेश की झुकीनि” हा स्वास्थ्यवर्धक आणि चविष्ट-रुचकर कॉनसेप्ट का नाही चालणार? अर्थात हे प्रयोगशील, हुन्नरी, माणसे जोडणाऱ्या, नेतृत्वगुण संपन्न व्यक्तिमत्वाचे काम आहे. मी भला, माझे शेत भले असा विचार असेल तर, जाउद्या.
चुलीवरचा चहा, गुळाचा चहा चालू शकतो तर “विदेश की झुकीनि” हा स्वास्थ्यवर्धक आणि चविष्ट-रुचकर कॉनसेप्ट का नाही चालणार?
झुकीनी लागवड करताय! काय सावधगिरी बाळगाल?
मित्रहो, झुकीनिला किलोमागे 20 रु चा दर मिळाला तर पंचात्तर दिवसांत पैसा डबल होतो आणि दोनशे चा भाव मिळाला तर मालामाल विकली ची बंपर लॉटरी लागते! हे कितीही आकर्षक असले तरी आज कुछ तुफानी करते है! असा अविचार करून, एकदम मोठ्या क्षेत्रात लागवड झुकीनि लागवड करू नका. सुरुवातीला चार पांच बिया टोचून पिकाचा अभ्यास करा. लागवड वर्षभर करता येते. नियमित पुरवठा करणारा शेतकरी व्यापाऱ्याला हवा असतो म्हणून टप्या टप्याने लागवड करा. त्याच मातीत दुसऱ्यांदा लागोपाठ लागवड करू नका, त्यामुळे रोगकीड व्यवस्थापनाचा खर्च वाढू शकतो. विदेशी भाज्यामध्ये 30 ते 40 भाज्यांचा समावेश होतो. हळूहळू करत सर्व प्रकार करून बघा. काही भाज्यांना हायड्रॉपोनिक्स तंत्र लागते त्याचा भांडवली खर्च मोठा असतो पण तसा प्रयत्न केला जाऊ शकतो. सुरुवातीला झुकीनि सोपी, सहज आहे अर्थात लोभ नियंत्रण व चोख व्यवस्थापन हा मंत्र जपेल तो वन टू का फोर करत दुनिया झुकवू शकेल.
मित्रहो, रिसेटएग्री डॉट इन या वेबसाइट च्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी नियमित संवाद साधत आहोत. प्रत्येक विदेशी भाजीची माहिती देणार आहोत म्हणून वाचत रहा!
झुकीनि सारख्या विदेशी भज्यावरील आमचे विविध लेख वाचायला विसरू नका!
दोन मिनिटांत वाचून होणारे आमचे लेख आपल्याला एक उत्तम शेतकरी व्हायला मदत करतील. काही लेख आपल्याला जागृत करतील, मनो धैर्य उंचावतील, उपयुक्त माहिती देतील, प्रश्न विचारतील किंवा सोडवतील. तुम्हाला फक्त तुमच्या दिवसातून दोन मिनिट आमचे लेख नियमित वाचायचे आहेत. आम्ही कुठलीही फी मागत नाही. आमच्या फेसबुक पेजला लाइक करा किंवा व्हाटसअप चैनल ला जॉइन करा. नॉटिफिकेशन सुरू ठेवा आणि तयार व्हा.. रोज थोडे वाचन.. रोज थोडा बदल करायला!





