Soil testing kit
Skip to product information
1 of 1

resetagri

खरेखुरे सेंद्रिय कीटक नियंत्रण शोधत आहात? ॲमेझॉनवर आहे तुमच्यासाठी खास उत्पादन, तेही शानदार ऑफरसह!

खरेखुरे सेंद्रिय कीटक नियंत्रण शोधत आहात? ॲमेझॉनवर आहे तुमच्यासाठी खास उत्पादन, तेही शानदार ऑफरसह!

उत्कर्ष ॲग्रोकेमचे 'बेव्हेरोज पी' – पिकांच्या संरक्षणासाठी एक क्रांती


शेतकरी बांधवांनो, पिकांवर वेगाने पसरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपण नेहमीच अनुभवतो. सुरुवातीला आरशासारखी चमकदार दिसणारी पिके, हिरवीगार पाने, दमदार फांद्या आणि बुंधे अचानक निस्तेज दिसू लागतात. त्यांची चमक नाहीशी होते, पाने पिवळसर होतात, डाग पडतात, काजळी वाढते, पाने चिकट होतात. कधीकधी पाने कापली जातात किंवा त्यावर नागमोडी पांढऱ्या रेषा दिसतात, फांद्या, खोडे आणि फळांवर भोके पडतात. ही लक्षणे दिसताच आपल्याला पिकावर कीड आली आहे, याची जाणीव होते.

पिकावर कीड आल्यावर त्याची वाढ नीट होत नाही, हवा तसा फुलोरा येत नाही, फळे लागत नाहीत, पिकाला दिलेल्या खतांचे योग्य शोषण होत नाही आणि कीटकनाशकांचा खर्च वाढतो. वाढीव खते आणि संजीवके द्यावी लागतात, ज्यामुळे खर्च वाढतो, पण उत्पादन कमी होते. बाजारात चांगला भाव न मिळाल्यास आपली मोठी कुचंबणा होते, पिकासाठी केलेला खर्च वसूल होत नाही आणि मेहनत व वेळ वाया जाते. अशा वेळी आपली मनःस्थिती बिघडते.

यावर उपाय काय? किडींवर नियंत्रण कसे मिळवाल?

या परिस्थितीतून मार्ग काय? आपण असे काय करू शकतो, ज्यामुळे आपल्या पिकावर कीड येऊ नये किंवा ती इतक्या वेगाने पसरू नये? जर हे शक्य झाले, तर पिके जोमाने वाढतील, चांगली फुलतील, भरपूर फळतील आणि उत्पादन चांगले येईल. खर्चात बचत झाल्यामुळे बाजारात सर्वसाधारण भाव मिळाला तरी चांगला नफा मिळू शकेल.

असे होऊ शकते का? किडींच्या वेगाने पसरणाऱ्या प्रक्रियेवर नियंत्रण कसे शक्य आहे? येथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या: आपण सुरुवातीला किडींवर नियंत्रणासाठी कीटकनाशके वापरण्याबद्दल बोललो आणि आता किडींच्या प्रसारावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा विचार करत आहोत.

किडी इतक्या वेगाने का पसरतात आणि त्यांची लक्षणे काय?

सर्वप्रथम, किडी इतक्या वेगाने का पसरतात आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे पिकांवर काजळी, चिकटपणा किंवा चुरडा-मुरडा का येतो, हे समजून घेऊ.

कोणत्याही किडीचे जीवनचक्र थोडेफार प्रमाणात वेगळे असले, तरी भरपूर खाद्य उपलब्ध असल्यास मादी कीड मोठ्या प्रमाणात प्रजनन करते. जन्माला येणारी पिल्ले खूप भुकेलेली असतात. पिकाच्या रसावर किंवा शरीरावर ती वेगाने हल्ला करतात. शक्य तितक्या वेगाने अन्नग्रहण करत ही पिल्ले मोठी होऊ लागतात. त्यानंतर ती कोष बनवतात. वातावरण चांगले असल्यास कोष काही दिवसांत फुटतात आणि त्यातून प्रौढ किडी बाहेर येतात. आता मिलन करून यातील माद्या पुढील पिढीला जन्म देतात.

उदाहरणार्थ, समजा पहिल्या मादीने ५० मादी अपत्ये दिली, तर आता एकाच वेळी ५० जीवनचक्रे सुरू होणार आहेत. एकूणच किडींची संख्या चक्रवाढ पद्धतीने वाढते आणि काहीच दिवसांत आपण पिकावर एकाच वेळी प्रौढ, अंडी, पिल्ले आणि कोष या चारही अवस्था मोठ्या प्रमाणात पाहू शकतो. याच प्रक्रियेचा भाग म्हणून आपण किडींची विष्ठा, स्राव, त्यावर वाढणारी काजळी, कापलेली पाने, भोके पडलेली पाने, पांढऱ्या रेघोट्या, किडींच्या माध्यमातून पसरणाऱ्या व्हायरसमुळे होणारा चुरडा-मुरडा आणि विशिष्ट प्रकारचे डाग ही लक्षणे पिकावर पाहू शकतो.

वेगाने वाढणाऱ्या किडींवर रोग पसरल्यास...

ज्याप्रमाणे आपण कोरोना, डोळे येणे, कांजण्या यांसारखे संसर्गजन्य रोग माणसांमध्ये पसरताना पाहिले आहेत, तसेच रोग पिकांवर येणाऱ्या किडींवर देखील येत असतात. असाच एक बुरशीजन्य रोग आहे, "व्हाईट मस्कर्डिन" (शब्दशः अर्थ - पांढरी शवपेटी!), जो किडींमध्ये पसरतो. 'ब्युव्हेरिया बॅसियाना' (Beauveria bassiana) नावाच्या बुरशीमुळे होणारा हा रोग मावा, फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी, बोंडअळी, पाने खाणारी अळी, हुमणी अशा अनेक किडींवर पसरतो.

या किडींच्या प्रत्येक अवस्थेवर (प्रौढ, अंडी, पिल्ले आणि कोष) या बुरशीचा प्रादुर्भाव होतो. पावसाळी वातावरणात हा रोग अधिक वेगाने पसरतो. मेलेल्या किडीतून ही बुरशी बाहेर येते आणि किडीवर पांढरे आवरण तयार करते. या आवरणातून तिचे बीजाणू हवा, पाणी आणि उडणाऱ्या किडींसोबत पसरतात. किडीच्या बाह्य आवरणावर हे बीजाणू चिकटून बसतात, तिथेच अंकुरित होतात आणि आतमध्ये शिरतात. किडीच्या संपूर्ण शरीरात पसरून विषारी पदार्थ सोडतात, ज्यामुळे कीड मरते. आतमधून पूर्ण सफाया झाल्यावर बुरशी आंतरबाह्य पृष्ठभागावर पांढरे बीजाणू तयार करते, ज्याला आपण व्हाईट मस्कर्डिन म्हणतो. एकूणच, व्हाईट मस्कर्डिन हा रोग कीडनियंत्रण करतो. अगोदर सांगितल्याप्रमाणे, या रोगास कारणीभूत असलेल्या बुरशीला 'ब्युव्हेरिया बॅसियाना' असे नाव असून, त्याचे जैविक-सेंद्रिय कीटकनाशक तयार करता येते. ते बाजारात देखील उपलब्ध आहे.

उत्कर्ष ॲग्रोकेमचे 'बेव्हेरोज पी' – एक प्रभावी उपाय

बाजारात या बुरशीवर आधारित अनेक उत्पादने विकली जात आहेत, पण म्हणतात ना 'पिवळे ते सगळे सोने नसते!' म्हणूनच या लेखाच्या माध्यमातून मी आपल्याला उत्कर्ष ॲग्रोकेम कंपनीच्या 'बेव्हेरोज पी' या उत्पादनाची माहिती देत आहे. या उत्पादनाच्या प्रत्येक ग्रॅममध्ये १०,००,००,००० (दहा कोटी) इतके बुरशीचे बीजाणू आहेत! म्हणजेच, एका किलोच्या पाकिटात दहा अब्ज!

ॲमेझॉनवरून उत्कर्ष ॲग्रोकेमच्या 'बेव्हेरोज पी'ची जोरदार विक्री सुरू असून २८० हून अधिक समाधानी ग्राहकांनी या उत्पादनाला ५ पैकी ३.८ स्टार दिले आहेत.

हे उत्पादन केंद्रीय कीटकनाशक मंडळाच्या अंतर्गत नोंदणीकृत व प्रमाणित आहे, म्हणजेच ते १९६८ च्या कीटकनाशक कायद्याच्या अधीन आहे. बेव्हेरोज पी च्या पाकीटाच्या मागील बाजूवर आपण या विषयी नोंदणी क्रमांक, परवाना क्रमांक व चोकोनी खूण पाहू शकता.

भात, मिरची, टोमॅटो, भेंडी, भुईमूग, कापूस, डाळी, ऊस, भाजीपाला पिके, तंबाखू, केळी, पपई आणि बागायती व फुलझाड लागवडीसह विविध पिकांवर हे उत्पादन अतिशय प्रभावी असून घरगुती बागेसाठी देखील वापरता येते.

भातातील पानांची घडी करणारी कीड, मिरचीतील वेस्टर्न फ्लॉवर थ्रिप्स, मिली बग्स, अमेरिकन बोंडअळीसारख्या अळ्या, हुमणी, बीटल, पांढरी माशी, तुडतुडे, थ्रिप्स, माइट्स, वाळवी यावर या 'बेव्हेरोज पी'ची शिफारस केली जाते.

वापर आणि प्रमाण:

  • पानांवरील फवारणी: ७-१० ग्रॅम/लिटरच्या दराने शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा, पानांच्या खालच्या बाजूस असलेल्या कीटकांना थेट लक्ष्य करून फवारणी करावी.
  • मातीत वापर: १-२ किलो/एकर आळवणी करून किंवा २५० किलो सेंद्रिय खत/मातीमध्ये मिसळून, एकसमान प्रमाणात पसरवावे किंवा १-२ किलो/एकर या दराने पाण्यात मिसळून ठिबक सिंचनाद्वारे सोडावे.

मित्रहो, अगोदर सांगितल्याप्रमाणे हे उत्पादन ॲमेझॉनवरून ऑनलाइन खरेदी करू शकता. सध्या यावर ३५% पेक्षा अधिक सूट दिली जात असून, एक किलो उत्पादन नाममात्र किमतीत उपलब्ध आहे. खाली दिलेल्या लिंकवरून आपण ते घरपोच मागवू शकता.

आपण हे उत्पादन ॲमेझॉनवरून मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास आपल्याला डिलिव्हरी चार्जेसवर १०० टक्के सूट तर मिळेलच शिवाय आपण हे उत्पादन कॅश ऑन डिलिव्हरी किंवा ई एम आय च्या माध्यमातून देखील खरेदी करू शकता.

आता 'बेव्हेरोज पी' खरेदी करा!
View full details
akarsh me

Join Our WhatsApp Channel

Stay updated with our latest news and content.

Join Our WhatsApp Channel
cow ghee price
itchgard price