Skip to product information
1 of 3

resetagri

टोमॅटोवर येणाऱ्या नाअळीमुळे होणारे नुकसान थांबवा: निरोगी पिकांसाठी स्मार्ट कीटक नियंत्रण पद्धत वापरा!

टोमॅटोवर येणाऱ्या नाअळीमुळे होणारे नुकसान थांबवा: निरोगी पिकांसाठी स्मार्ट कीटक नियंत्रण पद्धत वापरा!

टोमॅटोच्या पानांवर येणाऱ्या लीफ मायनर ( Tuta absoluta ) या किडीला मराठी मध्ये नागअळी व हिंदीत पत्ती सुरंगक असे म्हटले जाते. ही कीड टोमॅटोच्या पिकाचे भीषण नुकसान करू शकते. याचे नियंत्रण करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कीटकनाशकांमुळे खर्चात वाढ तर होतेच शिवाय पूर्ण नियंत्रण न मिळाल्याने उतारा कमी होता व त्याचा दर्जा देखील फारसा चांगला नसतो.  सुदैवाने रसायनांचा वापर न करता या किडीचे व्यवस्थापन करणे आता सोपे झाले आहे. पर्यायी पद्धत किफायतशीर आणि पर्यावरण पूरक देखील आहे. सादर आहे "मक्षिकरी टोमेटो कॅप्चर" फेरोमोन ट्रॅप /सापळा.  जो या विनाशकारी किडीचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी बचावाची पहिली व शेवटची पायरी ठरू शकतो. आजच भरगोस आणि निरोगी टोमॅटो उत्पादनासाठी पहिले पाऊल उचला!

आत्ता ऑफर तपासा!

प्रभावी नागअळी नियंत्रणासाठी : मक्षिकारी टोमेटो कॅप्चर 

मक्षिकारी टोमेटो कॅप्चर फेरोमोन ट्रॅप प्रौढ पतंगांना आकर्षित करून अडकवतो व मारतो. यासाठी कीटकांच्या नैसर्गिक वर्तनाचा वापर करतो. यामुळे त्यांच्या मिलन चक्रात व्यत्यय येतो. अंडी घालण्याचे प्रमाण इतके कमी होते की पिकावर कीड वाढूच शकता नाही.  ही एकात्मिक कीटक व्यवस्थापन (IPM) रणनीती पर्यावरण पूरक तर आहेच अतिशय किफायती देखील आहे.

मक्षिकारी टोमेटो कॅप्चर ची प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे:

  • अचूक देखरेख आणि नियंत्रण: विशिष्ट प्रकारे तयार केलेले फेरोमोन ल्यूर प्रौढ टोमॅटो लीफ मायनर पतंगांना प्रभावीपणे आकर्षित करते, ज्यामुळे किडीची ओळख लवकर पटते आणि योग्य नियंत्रण उपाय करता येतात.
  • वेळेवर करा हस्तक्षेप: सुरुवातीचा प्रादुर्भाव पकडण्यासाठी आणि व्यापक नुकसान टाळण्यासाठी, लागवडीनंतर सुमारे १५ दिवसांनी सापळे लावा.
  • दिवसरात्र काम करते: प्रत्येक फेरोमोन ल्यूर सुमारे ४५ दिवसांपर्यंत प्रभावी राहतो, ज्यामुळे वारंवार बदलण्याची गरज कमी होते आणि तुमचा वेळ आणि पैसा वाचतो.
  • वापरायला सोपे: हे सापळे बसवायला आणि हाताळायला सोपे आहेत  - फक्त त्यांना तुमच्या टोमॅटोच्या रोपांच्या थोड्या उंचीवर लटकवा. कोणतीही गुंतागुंतीची प्रक्रिया नाही!
  • टिकाऊ आणि किफायतशीर उपाय: आपल्या कडील वतावरणासाठी डिझाइन केलेले असल्यामुळे हे सापळे दीर्घकालीन आणि किफायतशीर आहेत.
  • पर्यावरण पूरकता: यात कोणताही विषारी घटक नसल्याने मधमाश्या आणि मित्र कीटकांना कुठलाच धोका नाही. 

तुमच्या टोमॅटो पिकात नागअळी येईल का?

शेतकरी मित्रांनी टोमॅटो हे पीक लावले असल्यास नागअळी नियंत्रणा साठी खालील बाबींवर लक्ष्य ठेवावे.

  • या किडीला २०-२५°C तापमान व मध्यम ते जास्त आर्द्रता अनुकूल आहे. असे वातावरण असल्यास पिकावर कीड येण्याची शक्यता वाढते. मक्षिकारी टोमेटो कॅप्चर सापळे अवश्य लावावे.
  • ही कीड टोमॅटो व्यतिरिक्त बटाटा, वांगी, मिरची, ढोबळी मिरची, तोंडली या पिका प्रमाणे अशवगंधा, धतुरा, गुळवेल, रातराणी या वनस्पतींचा सहारा घेते. आपल्या परिसरात ही पिके किंवा वनस्पति असतील तर वर दिलेल्या वातावरणात प्रकोप होईलच हे लक्षात घ्यावे.
  • या किडीच्या प्रौढ पतंगांची उडण्याची क्षमता चांगली असल्याने कीड नवीन क्षेत्रा कडे वेगाने कूच करते. योग्य वातावरण मिळाल्यास काही दिवसांत किडीची संख्या प्रचंड वेगाने वाढते.  ही बाब देखील लक्षात ठेवण्यासारखी आहे.
  • तुमच्या येण्या-जाण्याच्या मार्गात मक्षिकारी टोमेटो कॅप्चर चा एक सापळा लावा. त्यात पतंग दिसला तर लगेच सजग व्हा

नागअळी बद्दल तुम्हाला ही महिती असणे गरजेचे आहे! मादी पतंग पानांवर अंडी घालते. अंड्यातून निघालेली अळी पानांमध्ये नागमोडी सुरळ तयार करून खाते, तर कधी फळांमध्येही शिरते. यामुळे पाने सुकतात आणि फळांचे मोठे नुकसान होते, उत्पादनात घट येते.

मक्षिकारी टोमेटो कॅप्चर लावते वेळी खालील बाबींवर लक्ष्य ठेवा.

  • किती सापळे बसवावे: तुमच्या टोमॅटोच्या शेतात चांगल्या परिणामांसाठी, लागवडीनंतर सुमारे दोन आठवड्यांनी प्रति एकर ८ सापळे बसवा. सापळ्यात पतंग अडकत असल्यास संख्या 15 पर्यन्त वाढवा. 
  • सापळा वेळीच बदलवा: दर ४५ दिवसांनी फेरोमोन ल्यूर बदलून परिणामकारकता सुनिश्चित करा.
  • नियमित देखभाल: फनेल ट्रॅप असेल तर पकडलेले कीटक काढून टाकण्यासाठी आणि त्यांची सापळे पकडण्याची कार्यक्षमता राखण्यासाठी सापळे आठवड्याला स्वच्छ करा.
  • योग्य उंचीवर सापळे लावा: सापळे अशा प्रकारे लटकवा की ते पिकाच्या ऊंचीच्या थोडे वर दिसतील. 

रिसेटएग्री या वेबसाइट च्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी उपयुक्त उत्पादनांच्या माहितीसोबतच ऑनलाइन ऑफर ची माहिती देखील पुरवतो. 

काळ व वेळे नुसार ऑफर बदलू  शकतात,  पण आम्ही दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास आपणास नवीन ऑफर्स, सोयीस्कर पेमेंट पर्याय, कॅश ऑन डिलिव्हरी, रोमांचक कॅशबॅक डील, या सुविधां सोबत इतर करोडो गरजेची उत्पादने घरपोच मिळतील.

ऑफर आता तपासा.

आता वाट कसली पहाताय. वरील लिंकवर क्लिक करा आणि हवे ते - हवे तितके निवडा!

View full details